पोलीस भरती Special: चालू घडामोडी 2025, Day-5! Police Bharti Special: Current Affairs 2025, Day-5!

✨ पोलीस भरती २०२५ – तुमच्या तयारीसाठी आमचा विशेष अभ्यासक्रम 

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर आधारित दर्जेदार लेख आणि मार्गदर्शन घेऊन येत आहोत.
आमचे ध्येय म्हणजे – तुमच्या यशामध्ये आमचाही सहभाग असावा आणि तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे.
आपल्या अभ्यासाला दिशा देताना आम्हाला आनंद होतो आहे. 🙌
म्हणूनच आमचे लेख वाचून त्याचा फायदा घ्या आणि इतर विद्यार्थ्यांनाही याची माहिती शेअर करा.
आपले छोटेसे प्रोत्साहन आम्हाला आणखी उत्तम सामग्री देण्यासाठी प्रेरणा देईल.

पोलीस भरती 2025 – चालू घडामोडी – प्रश्नसंच (1 ते 10)

प्रश्न. 1) परदेशात सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे ?

  • उत्तर – मोहम्मद सिराज (12 सामने)

प्रश्न. 2) परदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर होता, जो नुकतेच मोहम्मद सिराजने तोडला आहे ?

  • उत्तर – MS धोनी (11 सामने)

प्रश्न. 3) भारतीय टपाल विभागाने ‘रजिस्टर्ड पोस्ट सेवा’ कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?

  • उत्तर – 1 सप्टेंबर 2025

प्रश्न. 4) भारतात ‘रजिस्टर्ड पोस्ट सेवा’ कधी सुरु झाली होती ?

  • उत्तर – 1854 (ब्रिटिश राजवट)

प्रश्न. 5) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा आयत कर 25% वरून किती टक्क्यांपर्यंत वाढवला आहे ?

  • उत्तर – 50% पर्यंत

प्रश्न. 6) नुकतेच भारत भेटीला आलेले ‘फर्डीनांड आर मार्कोस’ हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ?

  • उत्तर – फिलिपिन्स

प्रश्न. 7) मानवी बाह्य ग्रह शोध (HOPE) संशोधन केंद्र कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे ?

  • उत्तर – लडाख

प्रश्न. 8) अलीकडेच कोणत्या ठिकाणी “ऑपरेशन खगल” राबवण्यात आले आहे ?

  • उत्तर – जम्मु काश्मीर

प्रश्न. 9) जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे ?

  • उत्तर – सिंगापूर

प्रश्न. 10) दरवर्षी “भारत छोडो आंदोलन दिवस” कधी साजरा करण्यात येतो ?

  • उत्तर – 8 ऑगस्ट

पोलीस भरती 2025 – चालू घडामोडी – प्रश्नसंच (11 ते 20)

प्रश्न. 11) आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड IESO 2025 स्पर्धेत रायांश गुप्ता याने कोणते पदक जिंकले ?

  • उत्तर – एक सुवर्ण आणि एक रौप्य

प्रश्न. 12) आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड IESO 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली ?

  • उत्तर – 7 पदके

प्रश्न. 13) खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 भारताने किती पदके जिंकली आहेत ?

  • उत्तर – 5 पदके (4 सुवर्ण, 1 रौप्य)

प्रश्न. 14) सिनसिनाटी ओपन 2025 पुरुष एकेरी स्पर्धेचा विजेता कोण बनला आहे ?

  • उत्तर – कार्लोस अल्काराझ (स्पेन)

प्रश्न. 15) सिनसिनाटी ओपन 2025 महिला एकेरी स्पर्धेची विजेता कोण बनली आहे ?

  • उत्तर – इगा स्वियातेक (पोलंड)

प्रश्न. 16) इंग्लंड आणि वेल्समधील भारतीय वंशाची  सर्वात कमी वयाची पहिली सॉलिसिटर कोण बनली आहे ?

  • उत्तर – कृषांगी मेश्राम

प्रश्न. 17) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे ?

  • उत्तर – आसाम

प्रश्न. 18) गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने “One Freezone Passport” लॉन्च केला ?

  • उत्तर – दुबई

प्रश्न. 19) भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे ?

  • उत्तर – कच्चा कापूस

प्रश्न. 20) सद्भावना दिवस कधी साजरा केला जातो ?

  • उत्तर – 20 ऑगस्ट

पोलीस भरती 2025 – चालू घडामोडी – प्रश्नसंच (21 ते 30)

प्रश्न. 21) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे ?

  • उत्तर – बोऱ्हाडेवाडी- मोशी, पुणे

प्रश्न. 22) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला काय नाव देण्यात आले आहे ?

  • उत्तर – स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण 

प्रश्न. 23) चेतेश्वर पुजारी कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने नुकतेच सर्व क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?

  • उत्तर – भारत

प्रश्न. 24) वानखेडे स्टेडियमवर 23 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूच्या लाइफ साइज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ?

  • उत्तर – सुनील गावस्कर

प्रश्न. 25) देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे ?

  • उत्तर – केरळ

प्रश्न. 26) ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार होणार आहे ?

  • उत्तर – नवी दिल्ली

प्रश्न. 27) महाराष्ट्रामध्ये कोणत्या तीन ठिकाणी AI सेंटर उभारली जाणार आहेत ?

  • उत्तर – मुंबई, नागपूर, पुणे

प्रश्न. 28) भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे ?

  • उत्तर – इस्रायल

प्रश्न. 29) रॅम्पेज हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?

  • उत्तर – हवेतून जमिनीवर मारा करणारे

प्रश्न. 30) दरवर्षी भारतीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो ?

  • उत्तर – 23 ऑगस्ट

पोलीस भरती 2025: प्रदान करण्यात आलेले पुरस्कार

» संयुक्त राष्ट्र सासकाव पुरस्कार 2025 – डॉ. मृत्युंजय महापात्रा

» साहित्य अकादमी पुरस्कार 2024 – सुधीर रसाळ (विंद्यांचे गद्यरूप)

» विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 – रावसाहेब बोराडे

» BCCI पॉली उम्रिगर पुरस्कार 2023-24 – जसप्रीत बुमरा

» ICC सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी 2024 – जसप्रीत बुमरा

» जनस्थान पुरस्कार 2025 – सतीश आळेकर

» छ. संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025 – अनादी मी अनंत मी.. (वि. दा. सावरकर)

» सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025 – INCOIS

» 34 वा व्यास सन्मान 2024 – सुर्याबाला (कौन देस को वासी: वेण की डायरी)

» गदिमा पुरस्कार 2024 – अशा काळे

» कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023 – निलीम कुमार

» इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 – मिशेल बॅचलेट (चिली)

» पर्सन ऑफ द इयर 2024 – डोनाल्ड ट्रंप

» ऑस्कर 2025 (सर्वोत्तम चित्रपट) – अनोरा

» 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार – विनोद कुमार शुक्ला

» महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 – राम सुतार

» साहित्य अकादमी अनुवाद

पुरस्कार 2024 – सुदर्शन आठवले

» लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 – कुमार मंगलम बिर्ला

» साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 – प्रदीप कोकरे (खोल खोल दुष्काळ डोळे)

» साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 – डॉ. सुरेश सावंत (आभाळमाया)

» लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 – नितीन गडकरी

» राजर्षी शाहू पुरस्कार 2025 – डॉ. जब्बार पटेल

» जागतिक अन्न पुरस्कार 2025 – मारीयांगेला हंग्रीया (ब्राझील)

» आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार – बानू मुश्ताक (हार्ट लॅम्प) (अनुवादक – दीपा भास्ती)

» डॉ. सी. डी. देशमुख पुरस्कार – नितीन गडकरी

» कलिंगरत्न पुरस्कार 2025 – धर्मेंद्र प्रधान

» आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार 2025 – वर्षा देशपांडे

ip inspire
ip inspire
Articles: 81

Newsletter Updates

Enter your email address below and subscribe to our newsletter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *